भायडी शिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
भायडी शिवराय बिबट्या आढळला शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण भायडी , तळणी , विरेगाव , बाभुळगाव शिवरात बिबट्या ची दहशत वन विभागाने बिबट्या जेरबंद करण्याची मागणी जालना जिल्हा रिपोर्टर संजीव पाटील जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील भायडी शिवारात माजी आमदार संतोष दसपुते यांच्या भायडी शिवारातील शेतात सागवान वृक्षजवळ काल दिनांक सोमवार रोजी बिबट्या दिसला.या मुळे शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाने बिबट्या चां त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी भायडी येथील शेतकरी गावकऱ्यांनी केली आहे.गेल्या आठ ते दहा दिवसा पासून ,विरेगाव भायडी,तळणी , बाभुळगाव शिवरात परीसरात बिबट्या आढळला त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री गव्हाला पाणी देण्या साठी जाणे बंद झाले आहे. मागच्या सोमवारी समाधान माळोदे आणि त्यांच्या पत्नी ला गव्हाला पाणी देत असताना बिबट्या दिसला. बिबट्या चे दर्शन झाले. बिबट्या च असेलच असे नक्की म्हणता येणार नाही वन विभागाचे म्हणणे.वन विभाग बिबट्या चे असेलच असे नक्की म्हणता येणार नाही असे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी म्हणतात असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. पण भायडी,तळणी,विरेगाव, बाभुळगाव शिवरात दिवसाआड बिबट्या चे दर्शन होत आहे. वन विभागाला निवेदन गावकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर जालना येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले असुन पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली आहे. भोकरदन आणि जालना छत्रपती संभाजी नगर येथील वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी भायडी येथे भेट देऊन गावकऱ्यांना काळजी घेण्यासाठी सुचना केल्या आहेत. वन अधिकारी कर्मचारी येऊन गेल्या नंतर पुन्हा बिबट्या चे दर्शन झाले आहे.


Comments
Post a Comment